दारू विक्रीच्या नव्या परवाना विरोधात तीव्र आंदोलन
सोशल डोमाक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज लाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी या पार्टीच्या सदस्यांनी दारू विक्रीच्या नव्या परवाना विरोधात तीव्र आंदोलन केले आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
राज्यतील 3000 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मध्ये आता दारु विक्रीसाठी नव्याने परवानगी देण्याचे राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारने रद्द करावा या मागणीसाठी आज अधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह करून तीव्र आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी या निवेदनात संघटनेच्या सदस्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांना राज्य सरकारने हरताळ फासू नये त्यासाठी बेकायदेशीर मध्ये विक्रीला पायबंध घालावा नव्याने 1000 मध्ये विक्री दुकानांना परवाना दिला जाऊ नये मॉल सुपर मार्केट व ऑनलाईन मध्ये विक्रीला परवाना देण्याचा घेतलेल्या निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
जर नव्याने आणि मद्यविक्रीची दुकाने सुरू झाली तर तरुणांचे भविष्य धोक्यात येईल त्यामुळे हा परवाना रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे एस डी पी आय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले