This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*व्हाय नॉट रेड या पाच दिवसांच्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन*

*व्हाय नॉट रेड या पाच दिवसांच्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन*

शहरातील वरेरकर नाट्य संघाच्या के बी कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये गुलमोहर बाग आर्टिस्ट ग्रुप तर्फे आयोजित व्हाय नॉट रेड या पाच दिवसांच्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन थाटात पार पडले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी चार वाजता करण्यात आली असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आय आय डब्ल्यू सी आर्ट गॅलरी बंगलोरचे क्युरेटर चित्रकार संजय चाफुलकर जे एन भंडारी स्कूल ऑफ आर्ट चे माजी प्राचार्य चित्रकार जे बी फडके आणि आर्ट अफेयर्सचे संस्थापक चित्रकार विश्वनाथ गुगरी उपस्थित होते.

पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित त्यांना गुलमोहर बाग आर्टिस्ट ग्रुपच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी दर्शनात मांडण्यात आलेल्या प्रत्येक पेंटिंगची पाहणी केली आणि पेंटिंग बाबत काय नवल वाटते याबद्दल प्रदर्शनात दिलेल्या चित्रकारांना प्रश्न विचारला आणि प्रदर्शन पाहून आनंद व्यक्त केला.

व्हाय नॉट रेड प्रदर्शनात गुलमोहर बागच्या 46 प्रतिभावंत चित्रकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. प्रमुख पाहुण्यांनी आणि प्रदर्शनाला भेट देण्याकरिता आलेल्या नागरिकांनी प्रदर्शन पाहून कलाकारांचे कौतुक केले.

हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्याकरिता 5 ऑक्टोबर पर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री आठ या वेळेत सुरू असून नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुलमोहर बाग आर्टिस्ट ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply