*मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही जिद्दीने यश मिळवता येते : माजी नगरसेक अनिल पाटील*
*मातृभाषेच्या शाळा वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा : माजी नगरसेवक अनिल पाटील*
*”” सरकारी शाळा बचाव व्यापक चळवळ आणि मातृभाषेतून शिक्षण देणे आपली सामाजिक जबाबदारी जागृती अभियान* *”” यशस्वी करण्याचा निर्णय : मोठ्या प्रमाणात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन*प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करावी*
_____________
बेळगाव तारीख 27 सप्टेंबर 2023 : मातृभाषेतून किमान प्राथमिक शिक्षण मिळणे ही प्रत्येक मुलाची एक मूलभूत अशी प्राथमिक गरज असते. अनेक शास्त्रीय संशोधनामधून हे सिद्ध झाले आहे की प्रत्येक मूल आपल्या मातृभाषेतून शिकले तर शिक्षणाची सर्वच क्षेत्रे सहजरित्या काबीज करू शकते. मग ते शिक्षण कोणत्याही प्रकारचे असो विज्ञानाचे असो, इंजिनिअरिंगचे असो, वैद्यकीय असो की अन्य कोणतेही असो. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये भांबावलेल्या प्रत्येक पालकांनी मातृभाषेमध्ये शिक्षण आपल्या मुलांना देणे हे अतिशय निकडीचे बनलेले आहे. प्राथमिक शिक्षणाचा खराखुरा पाया मातृभाषेच्या सहज चालत्या बोलत्या मार्गाने निर्माण झालेला असला तर पुढील शिक्षण मग ते उच्च शिक्षण असो की अन्य कोणतेही असो. म्हणून असे म्हणावेसे वाटते की संपूर्ण जगामध्ये मातृभाषेतून सर्व मुलांना किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळावे. असे म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ज्याला ते मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि जर ते मातृभाषेतून मिळाले तर तो गर्जना किंवा डरकाळी फोडत आपल्या जीवनाचा संघर्ष सहजरित्या पार करेल. स्वतंत्र पूर्व काळामध्ये शिक्षण अतिशय अल्प प्रमाणात होते त्यानंतर समाजामध्ये जागृती करून शिक्षणामध्ये क्रांती करण्याचा प्रयत्न केला समाज परीवर्तन करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यामध्ये तसेच गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये काही समितीच्या शाळा स्थापन करण्यात आल्या दुर्गम भागामध्ये आणि जंगलात असणाऱ्या गावांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न केला समितीच्या शाळेच्या माध्यमातून गावोगावी शिक्षणाची जागृती केली शामराव देसाई, बहिर्जी शिरोळकर, बाबुराव ठाकूर, परशुराम नंदीहळी कर्मवीर भाऊराव पाटील मामासाहेब लाड यांनी घरोघरी शिक्षणाची गंगा पोहोचवली. आजही या धरतीवर भारताच्या पंतप्रधानांनी मातृभाषेतून शिक्षण देणे अनिवार्य आहे आणि सर्व देशांनी आपापल्या भाषेत मातृभाषेतून शिक्षण घ्यावे असे आवाहनही देखील केलेले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विकास अधिक होऊ शकतो याची सारासार विचार मांडला आहे . आज बेळगाव जिल्ह्यातल्या रिंग रोड प्रसंगी जळगाव मधील अनेक शेतकऱ्यांचे मुले देशी घडीला जाणार आहे कारण रोड मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावरती होणार आणि याचा परिणाम शिक्षणावर देखील होऊ शकतो तो रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला गेला पाहिजे समाजाच्या सर्वांगी विकासासाठी प्रत्येकाने पुढे येऊन कार्य केले पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या वतीने मातृभाषेतील शाळा प्रामाणिक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर शाळेतील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शाळा सुधारणा कमी केली शिक्षक पालक शिक्षण प्रेमी यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलायला हवी स्पर्धात्मक युगाच्या काळात योग्य प्रकारे त्यांना स्पर्धा परीक्षांचे ज्ञान देऊन प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या क्षमता निर्माण करावी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून एक परिपक्व व्यक्तिमत्व त्यांच्यात निर्माण करायला हवे. या धावपळीच्या जगात प्रत्येक ठिकाणी खूप मोठी स्पर्धा असून त्या क्षेत्रामध्ये टिकून राहण्याकरिता ज्ञानाबरोबरच कौशल्याचे देखील निर्मिती करून जिद्दीने यश गाठण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत दृढ निश्चय असेल तर कोणतेही यश मिळवायला अधिक वेळ लागत नाही. विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचन आणि त्याचे महत्त्व पटवून देऊन वाचन वाडी साठी विविध उपक्रम राबवून निर्माण करावी. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मना तील काढून टाकण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. ज्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आवड आहे यामध्ये त्यांना शिकण्यासाठी पुढाकार दिला गेला पाहिजे मुलांची अभिरुची कोणत्या ठिकाणी आहे हे पालकांनी आजमावून शिक्षकांनीही मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करावे तर एक सुदृढ समाज बनेल. प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जावा. भारताच्या सक्षमीकरणाचे कार्य विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर अवलंबून असते विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्यातील जिद्द चिकाटी आणि मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न आणि कार्यातील सातत्य हेच आपले ध्येय गाठू शकते. यासाठी वेळोवेळी समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. *असे प्रतिपादन माजी नगरसेवक आणि शहापूर वडगांव टिळकवाडी अनगोळ विभागातील शाळा सुधारणा कमिटीचे माजी अध्यक्ष श्री. अनिल पाटील यांनी “” सरकारी शाळा बचाव व्यापक चळवळ आणि मातृभाषेतून शिक्षण देणे आपली सामाजिक जबाबदारी जागृती अभियान* या अंतर्गत ते बोलत होते.
सरकारी शाळा सुधारणा कमिटी जिल्हा बेळगांव, शहर व ग्रामीण विभाग बेळगांव लोकप्रतिनिधी शाळा प्रेमी, हितचिंतक शिक्षक आणि विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने
*”” सरकारी शाळा बचाव व्यापक चळवळ आणि मातृभाषेतून शिक्षण देणे आपली सामाजिक जबाबदारी जागृती अभियान* व्यापक बैठक बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ मराठा मंदिरात व्यापक स्वरूपात बैठक बोलवण्यात आली होती.
*या बैठकीचे अध्यक्ष शाळा सुधारणा कमिटी चे माजी अध्यक्ष समाजसेवक शिक्षणप्रेमी मनोहर हुंद्रे होते.*
*प्रारंभी स्वागत शांताराम (देसुर) यांनी केले. प्रास्ताविक शिक्षणप्रेमी गंगाधर गुरव (संतिबस्तवाड) यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पा पाटील (सावगाव), अण्णाप्पा पाटील (बादरवाडी), मल्लाप्पा पाटील, प्रमोद रेडेकर (आगसगे) , बाबू पाटील (चलवेनटी) ,मनोहर संताजी (बस्ताड), कृष्णा झंग्रूचे (सोनोली), *माजी नगरसेवक आणि शहापूर वडगांव टिळकवाडी अनगोळ विभागातील शाळा सुधारणा कमिटीचे माजी अध्यक्ष श्री. अनिल पाटील यांनी “” सरकारी शाळा वाचवण्यासाठी व्यापक चळवळ आणि मातृभाषेतून शिक्षण देणे सामाजिक जबाबदारी जागृती अभियान* चळवळ यशस्वी करण्यासंदर्भात विचार मांडले. सुत्रसंचलन जोतिबा मराठे यांनी केले तर शाळा सुधारणा कमिटी चे सदस्य शंकर कोनेरी तसेच अंकुश केसरकर, शुभम शेळके, श्रीकांत कदम, प्रा. निलेश शिंदे, नारायण सांगावकर, मोहन हर्जी (सांबरा), भरमु बेळगावकर (अतीवाड), रामा तोलगेकर सातेरी चौगुले बेळवटी रमेश खनगावकर ( तारीहाळ), देवाप्प पाटील (गुंजेनटी) तसेच बेळगाव जिल्ह्यातील विविध शाळांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी शिक्षण प्रेमी हितचिंतक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*शाळा सुधारणा कमिटीचे माजी अध्यक्ष समाजसेवक मनोहर हुंद्रे पुढे म्हणाले;*
मातृभाषेतून शिक्षण घेणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यासाठी सरकारी शाळा वाचवण्यासाठी बेळगाव शहर बेळगाव तालुका खानापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या मातृभाषेच्या शाळा टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी सर्व संघटना एकत्र येऊन समाजाच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी व्यापक स्वरूपात मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज बेळगाव या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली .विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत मराठी भाषा मराठी संस्कृती अस्मिता बरोबरच इतर भाषांना सुद्धा ही आपल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावे आणि भारतीय भाषांचा संवर्धन करण्याकरिता प्रयत्न केला जावा बोलीभाषा जतन करण्यासाठी प्रयत्न केले जावेत मातृभाषेतून शिक्षण घेतलेले शिक्षण मुलांच्या उन्नतीसाठी प्रगतीपथावरून येण्यास मदत होऊ शकते याचा सारासार विचार पालक शिक्षक विद्यार्थी आणि समाजातील लोकप्रतिनिधी यांनी गंभीर्यतेने जागृती केली गेली पाहिजेत असा मराठी शाळा सरकारी शाळा आणि भाषा संवर्धन करण्याकरिता प्रयत्न केले जावेत वेगवेगळ्या शाळांमध्ये असणारी पटसंख्या दिवसेंदिवस घालवत चाललेली आहे शाळेचा दर्जा खालावत चाललेला आहे तो टिकवावा वाढवावा आणि सरकारी शाळा बद्दलचे मत अतिशय चांगल्या पद्धतीने उंचावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी पालक शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन लोक प्रतिनिधींचा आधार घेत वेगवेगळ्या सुविधा सरकारी शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कार्य केले गेले पाहिजेत असा बैठकीत ठराव करण्यात आला. अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये घालत आहेत तसेच सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस अतिशय कमी होत चाललेले याचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर होत आहे सरकारी शाळांच्या मध्ये शिक्षक कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने एकेका शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहेत शाळांच्या मध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याने शिक्षक भरती ही रखली सुद्धा आहे पण सरकार मात्र त्यांच्याकडे कानाडोळा करतोय आणि भरती कोणत्याही प्रकारे करत नाही शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पण शासनाला यायचं गांभीर्य नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते कुठेतरी थांबले गेले पाहिजेत मातृभाषेतील शाळा सरकारी शाळा सध्या अतिशय मोडकळीस आलेल्या शाळा पाहायला मिळतात पण त्याला दुरुस्त करण्यासाठी म्हणावा तितका निधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे त्यांना बसण्यासाठी सुद्धा शाळा काही ठिकाणी व्यवस्थित नाहीत जीर्ण झालेल्या वास्तू शाळा त्या कोसळून पडत आहेत त्या कुठेतरी दुरुस्त झाल्या गेल्या पाहिजेत सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक करिता भरमसाठ आर्थिक उदंड भरावाला लागत आहे त्यामुळे सरकारी शाळा वाचवण्याकरता पुढाकार घेतला गेला पाहिजे.
*शाळा सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष सदस्य शंकर कोणेरी पुढे म्हणाले;*
प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन करावी एसडीएमसी कमिटी शाळा सुधारणा कमिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता विविध उपक्रम हाती घेतले गेले पाहिजेत आणि ते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रत्येकाने पुढाकार घेतला गेला पाहिजे विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात जागृती केली जाऊन शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
________________