गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याचे काम सुनील आनंदाचे करत आहेत त्यांनी यावर्षी रुद्राक्षापासून गणरायाची मूर्ती साकारली असून ती 12 फूटची आहे.
गांधीनगर येथील रहिवासी असणारे आनंदाचे हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून नाना वाडी येथील गणेश उत्सव मंडळाची मूर्ती साकारत आहे.
त्यांनी यावर्षी जवळपास 34295 मुखी रुद्राक्षांचा वापर करून मूर्ती साकारली आहे यामध्ये त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा प्लास्टिकचा उपयोग न करता फक्त कागद रट आणि रुद्राक्ष वापरून गणेश मूर्ती साकारली आहे.
आपल्या सावळ्या वेळेमध्ये त्यांनी ही सुंदर आणि आकर्षक अशी गणेश मूर्ती साकारली असून ती सध्या डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. आधी त्यांनी सुकामेवा अक्रोड मोदक धान्य गोष्टी वापरून गणेश मूर्ती साकारली होती.
सुनील हे प्लंबिंग चा व्यवसाय करत असून आपल्या फावल्या वेळेमध्ये त्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून ही गणेश मूर्ती साकारली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील त्यांना मदत केली असून आजूबाजूचे नागरिक मूर्ती पाहण्याकरिता गर्दी करत आहेत.