*कु, तनुजा पाटील या विद्यार्थिनीची तायक्वांदो स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड*
नुकत्याच पार पडलेल्या दिनांक 6 सप्टेंबर रोजी निपाणी येथे व्ही एस एम आय टी कॉलेज श्रीपेवाडी रोड येथे पी यु सी जिल्हास्तरीय तायक्वांदो ,जुदो व कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमधून तायक्वांदो या क्रीडा प्रकारातून 59 किलो वजन गटात मुलींच्या गटामध्ये कु, तनुजा पाटील या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला यशस्वी विद्यार्थिनीला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या विद्यार्थिनीची होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे यशस्वी विद्यार्थिनी सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी विद्यार्थिनी आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धे दरम्यान या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातून निपाणी, चिकोडी, अथणी, रायबाग, गोकाक या ठिकाणावरून एकूण 80 पेक्षा जास्त मुला मुलींनी सहभाग घेतला होता.
तनुजा पाटील या विद्यार्थिनीला कॉलेजचे क्रीडा शिक्षक एस सी उदगट्टी सर , त्याचबरोबर तायक्वांदो प्रशिक्षक श्री बबन निर्मले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून प्रवीण पाटील संकेश्वर, उमाजी पवार कागल, प्रथमेश भोसले, देवदत्त मल्हाडे, अर्जुन बूर्ली , महेश ठोंबरे, अरुण राठोड ,ओमकार अलकनुरे, यांनी काम पाहिले.
तायक्वांदो या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्हा तायक्वांदो या संघटनेला जबाबदारी देण्यात आली होती संघटनेचे अध्यक्ष श्री विजय भाजंत्री, सेक्रेटरी बबन निर्मले खजिनदार प्रवीण पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.