चॉकलेटमधून विषबाधा झाल्याने किंवा अन्य कोणत्या पदार्थाने विषबाधा झाल्याने आठ जणांची प्रकृती खराब होऊन रेल्वेमध्ये आठ जण बेशुद्धावस्थेत असल्याची घटना घडली आहे तसेच या सर्व जणांना उपचाराकरिता सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या वास्को निजामुद्दीन ट्रेनमध्ये प्रवास करणारे मध्य प्रदेशातील आठ प्रवासी बेशुद्धअवस्थेत आढळून आले आहेत सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
त्यांना चॉकलेट मधून विषबाधा किंवा गांजामुळे प्रकृती खराब झाल्याचा अंदाज सध्या पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोव्यामधून स्थानक सोडल्यानंतर एकाच डब्यात प्रवास करणारे आठ प्रवाशांना दोन वेळा उलट्या झाल्या त्यानंतर ते झोपी गेले त्यानंतर ते उठलेच नाहीत. त्यांनी प्रतिसाद सुद्धा न दिल्याने बेळगाव स्थानक एक तास रेल्वे पोलिसांना ही माहिती देण्यात आली पोलिसांच्या तपासणी केली असता सर्वजण आढळून आले.
त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार करीत दाखल करण्यात आले असून यांची प्रकृती नक्की कशामुळे खराब झाली आणि ते बेशुद्धावस्थेत गेले याचा तपास पोलीस घेत आहेत