मार्कंडेय साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी तानाजीराव पाटील तर उपाध्यक्षपदी आर आय पाटील यांची निवड
काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड आज पार पडली. तत्पूर्वी नूतन संचालकांना सकाळी दहा वाजता कारखान्यावर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती त्यानंतर सर्व संचालक उपस्थित झाल्यानंतर अकरा वाजल्यापासून अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी ची निवड प्रक्रिया सुरू झाली.
याप्रसंगी प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने कारखान्याच्या नियोजन अध्यक्षपदी तानाजीराव पाटील आणि उपाध्यक्षपदी आर आय पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
त्यामुळे आता मार्कंडेयाला नवीन नेतृत्व प्राप्त झाले. त्यानंतर सर्वांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना शुभेच्छा देऊन त्यांना मिठाईचे वाटप केले.
याप्रसंगी मावळते अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी निवडणूक सुरळीत पार पाडल्याबद्दल सर्वांचे आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर बोलताना नूतन उपाध्यक्ष आर आय पाटील म्हणाली की बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा बळकट करण्याकरिता ज्येष्ठ दिवंगतरे येथे रामभाऊ पोतदार यांनी मार्कंडेय साखर कारखान्याची स्थापना केली होती त्यानंतर गुरु अण्णा माजी आमदार के बी आय पाटील अष्टेकर साहेब यांना कांबळे यांनी कारखान्याची उभारणीसाठी मोलाचे प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नातूनच सध्या साखर कारखाना दिमाखात उभा आहे आणि अशाच प्रकारे पुढेही आम्ही तो उभा ठेवू अशी ग्वाही दिली.
त्यानंतर नूतन अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी मावळचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण कार्यरत राहू असे सांगितले या प्रसंगी सर्वांचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच आपण आपल्या पदावर चांगले काम करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.