वन खात्यातर्फे सेवा बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.वन संपत्तीचे आणि वन्य प्राण्यांचे संरक्षण करताना जंगल तस्कर आणि शिकारी यांच्या समवेत झालेल्या चकमकीत संपूर्ण देशभरात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना शहीद स्मारक येथे आदरांजली वाहण्यात आली.
दरवर्षी अकरा सप्टेंबर रोजी वन खात्यातर्फे राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे आयोजन करण्यात येते.बेळगावातील वन खात्याच्या कार्यालयाच्या आवारात शहीद स्मारक फुलांनी सुशोभित करण्यात आले होते.मिलिटरी बँडने संगीताची धून वाहून आदरांजली वाहिली.यावेळी उपस्थित वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी शस्त्रे उलट करून आदरांजली वाहिली.कार्यक्रमाला लष्करी,पोलीस आणि वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.लष्करी ,पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी संपूर्ण देशभरात सेवा बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांची नावे वाचण्यात आली.वन खात्याच्या राष्ट्रीय हुतात्मा दिन कार्यक्रमाला वन खात्याचे कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते.