भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ रयत मोर्चाच्या वतीने पंत बाळेकुंद्री येथील पंतनगर येथे हेस्कोम कार्यालयाला घेराव व बेळगाव ते बागलकोट रस्ता रोको आंदोलन यशस्वीरित्या संपन्न झाले, पावसाने दडी दिल्यामुळे शेतामध्ये पिके वाळून जात आहेत विहिरीमध्ये व बोरवेल मध्ये पाणी आहे पण शेतकऱ्याला शेतामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी मर्यादित वीज उपलब्ध होईना, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. याप्रसंगी बोलताना राज्यसभा सदस्य व भाजपा कर्नाटक राज्य रयत मोर्चा अध्यक्ष श्री इराणा कडाडी म्हणाले शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून रू. 6000 तसेच भाजपा राज्य सरकारकडून रू. 4000 असे एकूण रक्कम रु. 10000 किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मिळत होते, काँग्रेस सरकारने सत्तेत आल्या आल्या रू. 4000 निधी बंद केले आहेत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवलेल्या विद्यानिधी 560 कोटीचा फंड बंद केलेला आहे, कर्नाटकातील किसान कार्डधारक 50 लाख शेतकऱ्यांना मिळणारे प्रत्येकी रु.10000 अनुदान बंद केलेले आहेत, अशा अनेक उपयोगी योजना बंद करून काँग्रेस सरकारने कर्नाटकातील सर्व शेतकरी बंधूंवर अन्याय केलेला आहे, दिवसात किमान 7 तास विद्युत पुरवठा झालाच पाहिजे अशी मागणी इराणा कडाडी यांनी केली.
भाजपा बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री संजय पाटील म्हणाले रात्री अपरात्री अर्धा, एक व दोन तास विद्युत पुरवठा केल्यामुळे शेतकरी रात्रभर शेतामध्ये राहत आहेत त्यामुळे त्यांची झोप मोड होत आहे, एवढ्या कमी विद्युत पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना मर्यादित पाणी पोहोचत नाही त्यामुळे दिवसा 7 तास विद्युत पुरवठा केलाच पाहिजे, भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव म्हणाले खडीमशीन वाल्यांना 24 तास वीज पुरवठा केला जातो पण देशाचा अन्नदाता शेतकरी याच्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले जात आहे आणि कर्नाटक राज्य सरकार झोपा मारत आहे, उद्यापासून नेहमी दिवसा 7 तास विद्युत पुरवठा न झाल्यास बेळगाव बंद सारखे उग्र आंदोलन हाती घेतले जाईल याची सरकारने नोंद घ्यावी.
या कार्यक्रमाला बेळगाव ते बागलकोट रस्त्यावर बसून शेकडो शेतकऱ्यांनी किमान दीड तास रस्ता रोको आंदोलन केले तसेच सरकार विरोधी घोषणा दिल्या, सर्व शेतकरी बैलगाड्या चाबूक आणि ट्रॅक्टर घेऊन आंदोलनाला पोचले होते, या आंदोलनाला युवराज जाधव, शंकर मल्लन्नवर, मलिकार्जून माद्दन्नावर, तिप्पाजी मोरे, भरमा गोमान्नाचे, शहाजी जाधव, पंकज घाडी, प्रदीप सन्नीकोप्प, शशीमाऊली कुलकर्णी, नारायण पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते, याप्रसंगी हेस्कॉमचे अधिकारी उपस्थित होते, त्यांनी निवेदन स्वीकारून उद्यापासून दिवसा 7 तास विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन दिले, याप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.🌸🌸🌸