मार्क्स वादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आली आहे या निवेदनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी केली आहे.
2014 मध्ये मोदी सरकारने प्रत्येक खात्यामध्ये 15 लाख देणार असे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही पंधरा रुपये सुद्धा अकाउंट मध्ये जमा झाले नसल्याने त्यांनी दिलेल्या आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
त्याचबरोबर जे शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा मोदी सरकारने नोकरी देतो असे आश्वासन दिले होते मात्र त्यांना सुद्धा नोकरी न दिल्याने सुद्धा अवस्था बिकट बनली आहे.बेटी बचाव बेटी पढाव असे मोदी सरकार नेहमी सांगत असते त्र त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे ते कार्यरूपात आणावे अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मागणी केली आहे.
तसेच जी महागाई वाढत चालली आहे ती महागाई कमी करावी. गरीब नागरिक आहेत ते फारच त्रासामध्ये आपले जीवन व्यतीत करत आहेत. रेशन धान्य देण्यात येत आहे त्यामध्ये पाच किलो जादा तांदूळ घ्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.