सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळची विधिवत पद्धतीने मुहूर्तमेढ
सामाजिक आणि सांस्कृतिक ठसा उमटलेले असे उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने गुरुवार दिनांक 7\9\23 रोजी सकाळी गणपती मंडपाचे विधिवत पद्धतीने मुहूर्तमेढ करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार अनिल बेनके साहेब यांच्या हस्ते खांबा रवण्यात आले यावेळी बोलताना बेनके यांनी श्री एकदंत युवक मंडळ कायमच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करीत असतात व ह्यापुढे ही असच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत रहावे ही बाप्पा चरणी प्रार्थना करून शुभेच्छा देण्यात आले व मंडळाचे कौतुक केले.
तसेच प्रभागातील नगरसेविका सौ नेत्रावती भागवत यांच्या हस्ते हार घालुन पुजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्याचे मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले व ह्या वर्षी मंडळाचे 3 रे वर्ष असुन मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच सध्याचा परिस्थिती वर देखावाही ह्या वर्षी मंडळाने आयोजन केले आहे त्यासाठी सर्व गणेश भक्तानी याचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष नागेश गावडे यांनी सांगितले आहे सूत्रसंचालन अरुण गावडे यांनी केले.
यावेळी विनोद भागवत,अशोक खवरे, सुधाकर कडोलकर,निर्मल कणेरी, प्रताप चौधरी, श्रीधर तम्मणाचे,विजय वर्मा,बाळू कोळम्बस्कर,रुपेश,राजु पाटील,पराग देशपांडे, आनंद नाईक,परशराम बेकवाडकर, सुधीर लगरकांडे,गिरीश कणेरी,विनय वेताळ,अंबज सावंत,साई कणेरी,दिलीप सनुचे, सुनील कणेरी, ओकाराम मेवाड,सुधाकर ताशीलदार,मारुती बाळेकुद्री,अनंत चौगुले,विनायक सस्प्ले, विक्रम वेताळ, लखन कणेरी,विजय भोगण,निटूरकर,विशाल पाटील, आदित्य नागराज, किरण लगरकांडे,विजय सुळगेकर, शंकर माने,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संतोष कणेरी यांनी या सर्वाचे आभार मानले 🙏