झेंडा चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची झाली मुहूर्तमेढ
गणेशोत्सव काळात डॉल्बी फटाके वाजवून पर्यावरणाचे प्रदूषण करत असतात.मात्र गेल्या 119 वर्षांपासून बिना डॉल्बी फटाके नसताना गणेशोत्सव साजरा करत प्रबोधनाचा वसा जपणारे एकमेव मंडळ आहे ते म्हणजे झेंडा चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ
शहरातील कांदा मार्केट येथे स्थित असलेल्या ठिकाणी म्हणजेच झेंडा चौक येथे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ 1905 पासून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करत आहे येथील विष्णू पाटणेकर यांच्या धान्य दुकानात 2 सप्टेंबर 1965 रोजी बेळगाव गावातील पहिल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली.
यावेळी विष्णू पाटणेकर गोपाळ पाटणेकर गोविंद याळगी रामचंद्र मुरकुंबी वामन कलघटगी यांच्या उपस्थितीत तसेच टिळकांच्या हस्ते शाडूच्या श्रीमूर्तीची विधी व प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
तेव्हापासून येथील कांदा मार्केट येथे पाटणेकर यांच्या दुकानात सुरू झालेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव नंतर दरवर्षी या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होऊ लागला. आता येथील मंडळाला 119 वर्ष पूर्ण झाले असून प्रबोधनाचा वसा जपणारे शताई श्री गणेश मंडळ म्हणून या मंडळाकडे पाहण्यात येत आहे.
1980 पासून गणेशोत्सव मंडळाची त्रिमूर्ती जवळच असलेल्या झेंडा चौक येथे प्रतिष्ठापना करण्याचा प्रकार सुरू झाला आहे या पद्धतीने आतापर्यंत 119 वर्षांचा प्रवास करची गणेशोत्सवाची परंपरा कधीच खंडित न करता तसेच लोकांकडून वर्गणी गोळा न करता दरवर्षी गणेशाचं या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे तसेच गेल्या वीस वर्षापासून शरीर सौष्ठव स्पर्धा आणि आठ वर्षांपासून करेला स्पर्धा देखील मंडळातर्फे आयोजित करण्यात येत आहे.
आज 6 सप्टेंबर रोजी येथील गणेशोत्सवाच्या मंडपाची मुहूर्तमेढ करण्यात आली यावेळी अध्यक्ष अमित किलेकर सेक्रेटरी राजू हंगरगेकर मिलिंद पाटणेकर आनंद पाटणेकर संचालक मोतीचंद्र दोरकाडी खजिनदार अजित सिद्धनावर आनंद अंकले सुरेश मुरकुंभे विकास कालकर टीकी गिरीश पाटणेकर यांच्या उपस्थितीत मुहूर्तमेढ रवण्यात आली.