स्मार्ट सिटीच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करा
बेळगांव:ओल्ड पीबी रोड ते दक्षिण मतदार संघातील एसबीआय सेंटर पर्यंतच्या रस्ता हा अवैज्ञानिक पद्धतीने करण्यात आला आहे त्यामुळे स्मार्ट सिटीच्या वैज्ञानिक सदस्या संदर्भात कर्नाटक लोकायुक्तांनी केला आहे त्यामुळे भ्रष्ट झालेल्या या कामाची चौकशी करण्याची मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सुजित मुळगूंद आणि राजकुमार टोपन्नावर यांनी केली आहे.
शहरामध्ये करण्यात आलेल्या अवैज्ञानिक पद्धतीने स्मार्ट सिटीच्या रस्त्यासाठी लाखो रुपयांचा निधी वाया गेला असून केंद्र सरकारने दिलेल्या 900 कोटी रुपयांचा खर्च दाखवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते राजू टोपणनावर म्हणाले की बेळगाव स्मार्ट सिटी बनविण्याची नियोजित योजना अमलात आणण्याऐवजी ते बाजूला सारून नेत्यांनी आपल्या हाताशी भ्रष्ट कारभार केला आहे.
तसेच अनेक रस्ते अ वैज्ञानिक पद्धतीने केल्या असून यामुळे व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यकाळात घडलेल्या चुकांचा कागदपत्रे चा पुरावा आपल्याकडे आहे.
त्यामुळे आम्ही सुमोटो गुन्हा दाखल करून स्मार्ट सिटीच्या योजनेतील गैरकारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करणार आहोत. शहरातील विकास कामे जी केली जात आहेत याकरिता जनतेचा पैसा वापरला जात आहे.
त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामात आतापर्यंत जे नुकसान झाले आहे त्याला सर्व व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरून नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत राजू टोपणनावर आणि सुजित मुळगुंद यांनी केली.