धोकादायक बेळगाव चोर्ला पणजी मार्ग करून वाहतुकीसाठी सुरक्षित करावा अशी मागणी कणकुंबी पारवड आमटे जांबोटी गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी आज रास्ता रोको करून केली.
या सर्व ग्रामस्थांनी रास्ता रोको केला असल्याने पणजी बेळगाव महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प करण्यात आली त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी सदर निवेदन स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव पणजी मार्गावर रस्ता करून आंदोलन छेडून देण्यात आले. येथील मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होत आहे तसेच खड्डा चुकाविण्याच्या नादात अनेक जणांचा अपघात झाला आहे.
त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करून नागरिकांना येण्या जाण्याकरिता सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी रास्ता रोको करून नागरिकांनी केली.