डॉ संजय पंत बाळेकुंद्री यांना “जीवन गौरव पुरस्कार २०२३”
श्री पंत भक्त मंडळ भुदरगड, राधानगरी ,कापशी विभागाच्या वतीने गारगोटी येथे गुरुबंधू व भगिनींचा महामेळावा रविवार दि.३सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्वांचे श्रद्धास्थान असणारे गुरुवर्य डॉ.श्री संजय अरुण पंतबाळेकुंद्री (अक्कोळ) यांना “जीवन गौरव पुरस्कार- २०२३ ” देवून गौरवण्यात आले.
लोकसेवेचा अखंड ध्यास घेऊन वैद्यकीय सेवेतून प्रामाणिक, निस्वार्थी सेवा व आध्यात्मिक क्षेत्रात संस्कृती,धर्म आणि अस्मिता टिकवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन, गारगोटी विभागाचे अध्यक्ष योगेश पाटील,श्री. दिगंबर कुरळे चंद्रकांत सुतार,श्री. दत्तामामा बर्गे ,सुहास सातोस्कर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
श्री इंदुबाई मंदिर सांस्कृतिक हॉल गारगोटी येथे संपन्न झालेल्या या महामेळाव्यात पायी दिंडी मार्ग सेवेत मदत करणारे अन्नदाते,कार्यकर्ते,सेवेकरी या सर्वांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
बोधपीठ अंतर्गत श्री. सुहास सातोस्कर (सावंतवाडी) ,सौ सीमा कुलकर्णी (निपाणी) चरणदास महाराज – राजगोळी ,ओंकारेश्वर स्वामीमहाराज – रामकृष्ण मठ , बेळगाव, मल्लिकार्जुन जगजंपी – बेळगाव यांचे प्रवचन झाले.
या मेळाव्यास गारगोटी, राधानगरी, गडहिंग्लज ,कापशी, निपाणी भागातील हजारो गुरुबंधूं- भगिनींनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.