बेळगाव – बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवल चे आज शनिवारी महिलांच्या स्पर्धा आयोजनाद्वारे शानदार उद्घाटन झाले. शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश फेस्टिवलचे,श्री राजमाता सोसायटीच्या चेअरमन सौ मनोरमा देसाई यांच्यासह, भक्ती महिला सोसायटीच्या चेअरमन ज्योती अगरवाल, डॉक्टर सौ मीना पाटील,सौ रुपाली जनाज, सौ प्रतिभा नेगिनहाळ, सौ स्मिता आर्य,भक्ती देसाई,शाळेच्या प्राचार्य अलका जाधव यांंच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री गणेश फेस्टिवल बेळगाव 2023 चे शानदार उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी श्री भक्ती महिला सोसायटीच्या अध्यक्षा सौ ज्योती अग्रवाल यांनी सर्वांचे स्वागत करून गणेश फेस्टिवल संदर्भात माहिती दिली.ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यमा शाळेच्या प्रिन्सिपल सौ अलका जाधव यांनी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांची माहिती दिली. प्रतिभा नेगिनहाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री गणेश फेस्टिवलच्या आजच्या पहिल्या दिवशी फ्री अँड रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला आहे.