सेंटपॉल हायस्कूल आणि पोलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाइल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 55 व्या फादर एडी अंतरशालीय बादपद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदर स्पर्धा कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती यावेळी या समारंभाचे अध्यक्षस्थानी सेंट पॉल हायस्कूलचे प्राचार्य फादर डॉ हे होते तसेच व्यासपीठावर पलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईडचे अध्यक्ष डॉक्टर माधव प्रभू उपाध्यक्ष परेश मुरकुटे सुप्रसिद्ध व्यवसायिक नागेश छाब्रिया सेक्रेटरी अनिकेत क्षेत्रीय क्रीडा समितीचे चेअरमन अमित पाटील फादर फर्नांडिस यांच्यासह अन्य उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेचे उद्घाटन करून प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांनी खेळाडूंना फुटबॉल मुळे शरीरात ताकद वेग आणि धमक वाढते असे सांगितले खेळ खेळून आपण आपल्यामध्ये असलेली खेळाडू वृत्ती जोपासतो तसेच स्वतः मधील नेतृत्वगुणांचा विकास साधतो असे प्रतिपादन केले.
त्यानंतर या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला यावेळी जवळपास 20 शालेय संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यावेळेस सर्व स्पर्धकांची एकमेकांशी ओळख करून देण्यात आली त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी पालक फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर स्पर्धही बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 पर्यंत चालणार असून फुटबॉल पट्टूंनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.