विवाह समारंभात केलेल्या भोजनामुळे जवळपास शंभर हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे.बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हीरेकोडी गावात ही घटना घडली आहे.झाकीर पटेल यांच्या मुलीच्या लग्नात भोजनाचे आयोजन केले होते.लग्नात भोजन केलेल्या शंभर हून अधिक जणांना जेवण केल्यावर काही वेळातच पोटात दुखणे, उलटी होणे असा त्रास सुरू झाला.पन्नास हून अधिक जणांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य जणांना खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.विवाहात भोजन करून आपल्या गावी परतलेल्या मिरज मधील काही नातेवाईकांना देखील अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे.चिकोडी विभागाचे उप अधीक्षक गौडर यांनी हिरेकोडि गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
D Media 24 > Crime > *जवळपास शंभर हून अधिक जणांना विषबाधा*
*जवळपास शंभर हून अधिक जणांना विषबाधा*
Deepak Sutar29/08/2023
posted on


Leave a reply