बेळगुंदी येथील गायरान जमीन ताब्यात घेण्याची हालचाल कर्नाटक शुगर इन्स्टिट्यूटने सुरू केली आहे त्यामुळे आपल्या गावची एक इंच ही जमीन देणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला असून या संबंधी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
बेळगुंदी गावात गायरान क्षेत्र म्हणून नोंद नसल्याने कर्नाटक शुगर इन्स्टिट्यूटने येथील 28 एकर जागा आपल्या नावाने नोंद करून घेतली आहे या जागेमध्ये बेळगुंदी येथील सर्व जाती जमातीच्या लोकांचे स्मशान आहे मात्र या जागेवर कर्नाटक शुगर इन्स्टिट्यूट जागा काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे.
जर कर्नाटक शुगर इन्स्टिट्यूटने असे केले तर गावासाठी गायरान जमीन शिल्लकच राहणार नाही तसेच या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदानच शिल्लक राहणार नाही असे निवेदनात गावकऱ्यांनी म्हटले असून आपल्या गावची एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असे बेळगुंदी गावाच्या गावकऱ्यांनी म्हटले आहे.
सध्या कर्नाटक शुगर इन्स्टिट्यूट बेळगुंदी गावातील गायरान जमीन घेण्याच्या बाबतीत वेगवान हालचाली सुरू करत आहेत त्यामुळे त्यांनी असे न करता गावची जमीन सोडून दुसरी जमीन घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
यावेळी या संबंधिचे निवेदन आज मृणाल हेबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी दिले असून म्हणून हेबाळकर यांनी सुद्धा गावची जमीन न घेता दुसरी जमीन घेण्याची सूचना कर्नाटक शुगर इन्स्टिट्यूट ला केली आहे.