धनश्री कडोलकरा चा सेवा नियुक्ति निमित्त सत्कार
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात बी.ए.,बी. कॉम., बी.एस्सी., एम. कॉम.आणि एम. एस्सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला माजी प्राचार्य जी.वाय. बेन्नानळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाँ.एच.जे.मोळेराखी होते .
या कार्यक्रमांमध्ये बी.कॉम. ची विद्यार्थिनी धनश्री कडोलकर ची बी.एस.एफ. मध्ये नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.आपल्या सत्काराला उत्तर देताना धनश्री म्हणाली की, स्वप्न बघून स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याने ध्येय नक्कीच साध्य आहे. बी.एस्सी. ची विद्यार्थिनी भावना गौंडवाडकर हिची सुध्दा बी.एस. एफ मध्ये नियुक्ति झाली आहे. या विद्यार्थिनीना एन.सी.सी.अधिकारी लेफ्टनंट प्रा.शिल्पा मुदगप्पगोळ यांचे विषेश मार्गदर्शन लाभले.
यावेळी माजी प्राचार्य जी.वाय.बेन्नाळकर प्रमुख अतिथी पदावरून बोलताना म्हणाले की, पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी प्राप्तीसाठी येणारे अडचणीला न घाबरतात तोंड दिले पाहिजे. एक दिवस यश नक्कीच पदरात पडते.अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डाँ.एच.जे.मोळेराखी म्हणाले की आपल्या कामावरती प्रेम केल्याने कार्य सुंदर बनते. जे आहे त्यातच सुख, आनंद भोगण्याचा प्रयत्न केल्याने मनुष्य सुखी राहतो.
या कार्यक्रमाला प्रा.जी.एम. कर्की, ग्रंथपाल सुरेखा कामुले, डॉ. डी. एम. मुल्ला, प्रा. राजू हट्टी, प्रा.अर्चना भोसले, प्रा.भाग्यश्री चौगले, प्रा.एस.आर नाडगौडा,प्रा. मनिषा चौगुले आदी प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश चिर्कोडे यांनी करुन शेवटी सर्वांचे आभार मानले.