विद्यार्थांनी तालुका पातळी कुस्ती स्पर्धेत केले यश संपादन
सरकारी मराठी हायर प्रायमरी शाळा येळ्ळूर येथील विद्यार्थांनी तालुका पातळी कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले आहे .
या स्पर्धेत प्रज्योती अनिल पाटील हिने 54 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे .तर ऋतुजा मारुती पाटील हिने 36 किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून शाळेचे नाव उज्वल केले आहे .
तसेच रोहन संतोष पाटील याने 38 किलो वजन द्वितीय क्रमांक घेऊन ज़िल्हा पातळी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने या सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे .