विविध प्रकारच्या राख्यानी बाजारातील दुकाने सजली
रक्षाबंधनाचा सण अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपला असून बाजारात विविध प्रकारच्या राख्यानी दुकाने सजली आहेत.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राख्यांचे दर वीस टक्क्यांनी वाढले आहेत.दोऱ्याचा दर वाढल्याने राखीचे दर वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत दहा रुपयांपासून ते पाच हजार रुपयापर्यंत वेगवेगळ्या राख्या उपलब्ध आहेत.पारंपरिक गोंड्याच्या राखी बरोबर विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.छोटा भीम,मिकी माऊस,डोरेमॉन,बेन टेन,स्पायडर मॅन, बाल गणेश,रुद्राक्ष,कृष्ण, लायटिंग या बरोबरच चांदीच्या राख्या देखील दुकानात उपलब्ध आहेत.विविध प्रकारचे खडे जडवलेले चांदीची राखी देखील विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. यावर्षी सोने आणि चांदीच्या राख्याना देखील मागणी असून काही जणांनी अगोदरच सराफी दुकानात आपल्या ऑर्डर दिल्या आहेत.परगावी पाठवण्यासाठी राखी खरेदी करण्यासाठी महिला आणि तरुणीची गर्दी दुकानात पाहायला मिळत आहे.