श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही बँक अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. सध्या या बँकेचा 72 वा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. तसेच या अहवालात सर्व जमाखर्च व्याज ठेवी सभासद यांचा संपूर्ण अहवाल बँकेने सादर केला असून अमृत महोत्सवी वर्षात बँक आपल्या सभासदांना देणार असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की बँक उत्तम उत्तम प्रगती साधत आहे. कोरोनाचा काळ सोडून बँकेने चांगली प्रगती साधली आहे. तसेच आता बँक वाताव्या वर्षात पदार्पण केली असून येणाऱ्या तीन-चार वर्षांमध्ये बँक अमृत महोत्सवी वर्षात पोहोचेल.
या अमृत महोत्सवी वरच्या करिता आम्ही बँकेच्या वतीने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. सभासदांना शेअर बोनस शेअर देणार आहे त्याचबरोबर नेत्रदान करणाऱ्या वारसाला 2500 रुपये सभासदांकरिता चष्म्याकरिता हजार रुपये दातांच्या कवटी करिता पंधराशे रुपये देणार असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
त्याचबरोबर बँक जनरल बोर्ड मीटिंगमध्ये अनेक ठराव करून बोनस शेअर वाटण्याचा विचार करत असल्याची माहिती देखील यावेळी पत्रकार परिषदेत प्रकाश मरगाळे यांनी दिली.
बोनस शेअर पाच वर्षे पूर्ण असलेल्या सभासदांना लागू होणार असून बँकेने यावर्षी एक कोटी छत्तीस लाख रुपये उलाढाल केली आहे तर यामध्ये निव्वळ 67 लाख 67 हजार 700 रुपये नफा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत चेअरमन प्रकाश मरगाळे, व्हाईस चेअरमन विजय पाटील ,संचालक मदन बामणे, संचालक राजू मर्वे, संचालक प्रवीण जाधव, संचालिका वंदना धामणकर यांच्यासह अन्य संचालक मंडळ उपस्थित होते.