https://fb.watch/mD57CwaEnX/?mibextid=9R9pXO
जिजामाता हायस्कूलमध्ये आज विद्यार्थिनींना पोकसो कायद्या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम जिजामाता हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील सुधीर चव्हाण आणि वकील वंदना भास्मे उपस्थित होत्या यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले .
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांचा परिचय करून देण्यात आला. तसेच बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी वकील सुधीर चव्हाण यांची निवड झाली असल्याने त्यांचा सत्कार देखील शाळेचे मुख्याध्यापक एन डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याअंतर्गत मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की आपली सुरक्षितता हीच मोठी जबाबदारी आहे.पोक्सो कायद्याची विद्यार्थिनींना माहिती होणे का गरजेचे आहे. याबद्दल त्यानी सांगितले.
त्यानंतर वकील वंदना भास्मे त्यांनी सुद्धा विद्यार्थिनींना पोक्सो कायद्या, डोमेस्टिक वाईलन्स म्हणजेच कौटुंबिक कलह याची माहिती दिली. आणि कायदा काय असतो याबद्दल सविस्तर विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रम हा आठवी ,नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.