19 व्या ‘श्री गणेश -2023 भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन
येत्या रविवार दि. 24 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता 19 व्या ‘श्री गणेश -2023’ या कर्नाटक -गोवा आंतरराज्य व कोल्हापूर जिल्हा भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.श्री गणेशोत्सवानिमित्त मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक, मार्केट बेळगाव (एमएसजीयुएम) यांच्यातर्फे ही स्पर्धा पार पडणार आहे.
ही स्पर्धा भारतीय शरीर सौष्ठव महासंघाच्या (आयबीबीएफ) नियमानुसार 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो आणि 80 किलो वरील गट अशा सात वजनी गटात पहिला क्रॉस भाग्यनगर, टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेला 24 सप्टेंबर रोजी दुपारी ठीक 4 वाजता प्रारंभ होणार असून तत्पूर्वी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत शरीरसौष्ठवपटुंची वजन तपासणी होईल. तरी सदर स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी गंगाधर (9845857270), सुनील राऊत (9620407700), बाप्पा गोवा (8806951799) अथवा वडम राजेश कोल्हापूर (9225835575) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमएसजीयुएमचे अध्यक्ष अमित किल्लेदार आणि केएबीबीएचे कार्यकारी अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर यांनी केले आहे.
तसेच स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये 5000, 4000, 3000, 2000, 2000 दाखल दिले जाणार आहे .तसेच टायटल विजेत्याला माय सप्लीमेंट बे न्यूट्रिशन पुरस्कृत 25,000 रु. व कै. प्रेमराज चिंडक स्मृति करंडक, उपविजेत्यास 11,000 रुपये आणि बेस्ट पोझर किताब विजेत्यास 3000 रुपये तसेच आकर्षक चषक व गिफ्ट हॅम्पर्स दिले जाणार आहेत.
या व्यतिरिक्त स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनार्थ एमएसबी माय सप्लीमेंट बे यांच्याकडून 1000 रुपयाचे डिस्काउंट व्हाउचर दिले जाणार आहे.
स्पर्धेत राज्य व केंद्र सरकारचे कर्मचारी भाग घेऊ शकतात. स्पर्धेच्या प्रत्येक गटात तीन पेक्षा अधिक स्पर्धक असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी स्पर्धक असल्यास त्या गटाची स्पर्धा रद्द केली जाईल असे कळविण्यात आले आहे .याबरोबच बेस्ट पोझरसाठी आणि स्पर्धेसाठी प्रत्येकी 200 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे.