बेळगाव: अस्मिता क्रिएशन बेळगांव निर्मित “दडपण” या चित्रपटाला उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने कर्नाटकातील पहिला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार देऊन गौरीविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन भाग्यनगर येथील सिटी हॉलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ शंकरराव सुगते आणि सचिव मंजुनाथ हगेदार, एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके , विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ शंकरराव सुगते व सचिव मंजुनाथ हगेदार यांच्या हस्ते दडपण आता आत्महत्येला पूर्णविराम या चित्रपटाला कर्नाटकातील पहिला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चित्रपटाचे निर्माते राजेश गणपती लोहार तसेच लेखक, दिग्दर्शक संतोष सुतार पुरस्कार स्वीकार केला.
याप्रसंगी डॉ शंकरराव सूगते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अस्मिता क्रिएशन प्रस्तुत दडपण हा चित्रपट सर्वोत्तम आहे .कारण हा चित्रपट पाहिल्याने नक्कीच आत्महत्या थांबतील.जनतेमध्ये जागृती निर्माण होईल. हा चित्रपट विद्यार्थी व आई-वडिलांनी आवर्जून पहावा.तसेच अस्मिता क्रिएशन अशा पद्धतीचे उत्तमो उत्तम चित्रपट निर्माण करून देभरात प्रसिद्ध हो अशा शुभेच्छा दिल्या. आमची संघटना सदैव अस्मिता क्रिएशनच्या पाठीशी आहे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रसंगी गीतकार, संगीतकार ,टेक्निशियन, कॅमेरा मॅन ,तसेच चित्रपटातील सर्व कलाकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला.