नागपंचमी अवघ्या दोन दिवसावर आली असून त्या निमित्त बाजारात नागाच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.नागपंचमी हा श्रावण मासातील पहिला सण असून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.विविध रंगातील आकर्षक नागाच्या मूर्ती बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पंचवीस रुपये पासून शंभर रुपये पर्यंत वेगवेगळ्या नागाच्या मूर्ती उपलब्ध आहेत.नागपंचमी निमित्त फराळाचे जिन्नस देखील उपलब्ध झाले आहेत. तंबीट,रवा बेसन चे लाडू,चकली,चिवडा आणि शंकरपाळी विक्रीचे स्टॉल लागले आहेत. चिन मुऱ्याचे लाडू,शेंगांचे लाडू तसेच चिवडा करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी चीनमुरे भट्टीत गर्दी दिसून येत आहे.