विद्याभारती राज्यस्तरीय योगा स्पर्धला प्रारंभ.
बेळगांव ता,18. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय योगा स्पर्धाला प्रारंभ झाला सदर स्पर्धेत राज्यातील 9 जिल्ह्यातून 180 स्पर्धकांनी भाग घेतला .
आहेत.
गुरुवारी सायंकाळी 7.00 वाजता या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, स्वामी विवेकानंद शाळेचे अध्यक्ष अँड चेतन मणेरीकर, देवेंद्र जिंनगौडा शाळेचे सचिव कुंतीसागर, विद्याभारती राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, विद्याभारती राज्य योग्य प्रमुख मंजुनाथ, विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर ,संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव विद्याभारती शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील या मान्यवरांचे हस्ते ओंमकार ,सरस्वती, भारत माता फोटोपूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की सध्याच्या धावपळीच्या जीवनात योग, ध्यानमुद्रा, नियमित करणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी शालेय विद्यार्थी व सर्व सामान्य जनतेने योग करणे काळाची गरज ठरली आहे असे ते म्हणाले.यानंतर व्यासपीठावरील विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तत्पूरी शाळेचे अध्यक्ष परमेश्वर वेगळे येणे आमदार विठ्ठल हलगेकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच अँड चेतन मनेरिकर, कुंतीसागर, यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता पेटकर व ऋतुजा जाधव यांनी आभार मानले.