मधुरा महिला मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा
शाहूनगर येथील मधुरा महिला मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी स्वातंत्र्यदिनी प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापका अध्यक्ष मीनाताई बेनके यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम याप्रसंगी महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आले. तसेच चिमुकल्यांनी देखील याप्रसंगी आपल्यातील कला गुण सर्वांसमोर प्रदर्शित केले.
यावेळी या कार्यक्रमाला मधुरा महिला मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्य उपस्थित होत्या यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.