विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार
<span;>बेळगांव:विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळावा याकरिता विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने आठवी,दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेले सर्व विद्यार्थी हे खेळाडू असून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये खेळण्याकरिता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी आपल्या भारताचे नाव उज्वल करावे हा हेतू ठेवून त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यामुळे एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके ,दडपण मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राजेश लोहार संतोष सुतार, नामवंत होलसेल बुक स्टॉलचे मालक अमित सुतार ,पिरणवाडी गावचे मूर्ती कलाकार ज्ञानेश्वर लोहार ,पिरणवाडी येथील बॅगचे दुकान मालक माणगावकर यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
<span;> तसेच सर्व विद्यार्थ्यांनी येणाऱ्या पुढील काळात अशाच प्रकारे भरघोस बक्षीस अशी मिळावावीत अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.यावेळी श्री विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर,उपाध्यक्ष बाळू लोहार, सेक्रेटरी राजु सुतार,उप सेक्रेटरी जोतिबा लोहार, खजिनदार संदीप मांडोळकर,आणि सभासद नामदेव लोहर,मारुती सुतार,प्रशांत बेळगावकर,पप्पू लोहार, प्रशांत सुतार,प्रकाश कम्मार आणि गोपाळ सुतार.तसेच श्री विश्वकर्मा महिला सेवा संघाच्या अध्यक्षा माधुरी सुतार,उपाध्यक्षा सोनाली मांडोळकर,सेक्रेटरी राणी लोहार, उपसेक्रेटरी स्वाती सुतार,खजिनदार नेहा देसुरकर,उपखजिनदार रेणुका सुतार सभासद गीता लोहार, लक्ष्मी गुरव,पूजा बेळगावकर आणि माधुरी लोहार हे उपस्थित होते.