कित्तूर राणी चन्नम्मा यांचा पुतळा बसवण्यावरून वाद : गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त
बेळगाव :जवळील कुरुबरहट्टी गावात वीर राणी कित्तूर चन्नमा पुतळा बसविण्या वरून वाद निर्माण झाला असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलिसांनी वीर राणी कित्तूर चन्नमाचा पुतळा ताब्यात घेतला असून सहा तरुणांना देखील ताब्यात घेतले आहे.वडगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गावातील सहा तरुणांना वीर राणी कित्तूर चन्नमा पुतळ्याची गावातील काही तरुणांनी रस्त्याच्या कडेला प्रतिष्ठापना केली होती.ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित कुरुबरहट्टी गाव गाठले.परवानगी न घेता पुतळ्याची प्रतिष्ठापना करता येणार नाही असे पोलिसांनी गावातील तरुणांना सांगितले .यावेळी पोलीस आणि तरुणांच्या मध्ये जोरदार शाब्दिक चकमक झडली.पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीहल्ला करावा लागला.
स्वातंत्र्य दिनाच्या आदले दिवशी पुतळा बसविण्याची घटना घडली आहे.त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी खबरदारी घेतली असून कुरुबरहट्टी गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.