गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचलावी ठोस पावले
गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे रात्री अपरात्री वाहन घेऊन फिरणाऱ्या चालकांवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरात चोऱ्याने घरफोड्या यासारख्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क रहावे तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची चौकशी करावी अशी सध्या मागणी आहे.
शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही मोठे प्रकरण शहरात पुन्हा घडू नये याकरिता पोलिसांनी शहरांमध्ये गस्त घालावी. संशयास्पद रित्या फिरणाऱ्या वाहन लोकांची चौकशी करावी अशी मागणी सध्या नागरिक करत आहेत.
तसेच पोलिसांना देण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे एखाद्याचा थांब घेतल्यास अवघ्या काही सेकंदात त्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांना समजणार आहे त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता ठोस पावले उचलावीत अशी मागणी आहे.