*बिजगर्णीत ‘माझी माती, माझा देश’ अभियान सोहळा संपन्न*
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त ‘माझी माती, माझा देश’ अभियान, आजपासून बिजगर्णी गावातून सुरुवात करण्यात आली. जवळपास एक हजार हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून पर्यावरण रक्षण कसे आणि का.. करावे याची माहिती सुभेदार हरीचंद्र शिंदे यांनी यावेळी विद्यार्थाना दिली.
बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात मराठा लाईट इन्फंट्री, ग्रामपंचायत आणि न्यू इंग्लिश हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमृत रोपवाटिके अंतर्गत १००० देशी झाडांची लागवड, माजी सैनिकांचा सत्कार, पंचप्राण शपथ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाला आज १२ ऑगस्ट पासून, सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हे अभियान राबवण्यात आले. न्यू इंग्लिश हायस्कुलच्या प्रांगणात अयोजित अध्यक्षस्थांनी बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री सुभेदार हरीचंद्र शिंदे होते. यावेळी ग्राम पंचायात अध्यक्ष मनोहर बेळगावकर, ग्रामस्थ कमीटी चेअरमन वसंत अष्टेकर, सुभेदार आनंद नार्वेकर, लक्ष्मीकांत गौंडाडकर, विक्रांत भोसले, नायक भुसारे, सह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी गावातील माजी सैनिक मधू भास्कळ, सुरेश भास्कळ, तानाजी भास्कळ, शिवाजी मोटर, परशराम भास्कळ, जोतिबा भास्कळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाची अंतर्गत अनेक झाडांची वृक्षारोपण करण्यात येत आहे. यावेळी ग्राम पंचायत सदस्य नामदेव मोरे,महेश पाटील, बबलू नावगेकर, संतोष कांबळे, लक्ष्मी पाटील, चंद्रभागा जाधव, मनीषा सुतार, यल्लाप्पा बेळगावकर, मारूती जाधव, गुंडू भास्कळ, मनोहर पाटील आदी उपस्थित होते.