लमानी समाजातील एकाच कुटुंबातील तिघा जणांचा विद्युत शॉर्टसर्किट झाल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेत आई वडील आणि मुलगी हे तिघेही मृत झाले असून ही घटना शहरातील शाहूनगर अन्नपूर्णावाडी अझम नगर भागात घडली आहे.h
घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी कॉइल घातल्यावर शॉर्ट झाल्याने पाणी गरम करण्याची कॉइल काढतेवेळी शॉक लागल्याने तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी करंट असलेली वायरचा या तिघांना स्पर्श झाला असल्याने या तिघांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सदर कुटुंबीय एका बांधकाम सुरू असलेल्या घरात वॉचमन म्हणून काम करत होते मात्र सकाळी करंट असलेले वायरचा स्पर्श झाल्याने तिघांचा मृत्यू झाला यामध्ये आई वडील आणि मुलगी मृत झाले.
या तीनही मृतांची अद्याप नावे समजू शकले नसले तरी नेमकी घटना कशी घडली याची चौकशी पोलीस करत आहेत ही घटना एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडली आहे.