एस के ई सोसायटीच्या रानी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालय च्या वाणिज्य विभागामध्ये स्पेक्ट्र 2023 चे आयोजन
सालाबादप्रमाणे यावर्षी ही आर पी डी महाविद्यालयच्या वाणिज्य विभागामध्ये स्पेक्ट्राचे आयोजन करण्यात आले ,या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या एस के ई सोसायटीच्या कार्यदश्री आणि जी एस एस महाविद्यालय च्या माजी प्राचार्या श्रीमती माधुरी शानभाग या लाभल्या, आध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ अभय पाटील हे होते,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा एस एस शिदें यानी सर्व विद्यार्थी स्पर्धकाचे आणि मान्यवराचे स्वागत केले ,प्रमुख पाहुण्याचा परिचय ही करूण दिला
प्रमुख पाहुण्या श्रीमती माधुरी शानभाग यांनी सर्व स्पर्धकाचे अभिनन्दन केले ,स्पेक्ट्रा हा विज्ञानाचा भाग जो सात रंगाच्या माध्यमातून एक नाविन्य दर्शवीतो,तसेच आपल्या जीवनात ही अशाच प्रकारचे नाविन्य निर्माण करण्याची प्रेरणा देतो,सर्व स्पर्धकानी याची प्रचीती घेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करावे,
प्राचार्य डॉ अभय पाटील यांनी सर्व स्पर्धकाना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन पूजा पाटील यांनी केले
स्पेक्ट्रा हा विभागीय कार्यक्रम आहे यात सर्व सेमेस्टरचे विद्यार्थी भाग घेतात,यावर्षी दहा संघानी यात भाग घेतला आहे,प्रत्येक संघाला भारतातील प्रसिद्ध नद्यांची नावें देण्यात आली आहेत
या कार्यक्रमात बिजनेस प्लान,डाक्यूमेंट्री, अॅड मॅडम शो, आशा विविध विषय-वार स्वयं विद्यार्थी तैयारी करून स्पर्धेत भाग घेता.चार दिवस चलणारा ह्या कार्यक्रमाची सांगता परितोषक वितरणने होते