हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट .
बेळगाव ता,4. टिळकवाडी येथील वॅक्सिंन डेपो मैदानावर रजपूत बंधू हायस्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभाग मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला.
मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात जी जी चिटणीस शाळेने केएलएस शाळेचा 4 -2 ,दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने गोमटेश शाळेचा 6–2 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा 2-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले , विजयी संघाच्या गोलरक्षक सिद्धांत वर्माच्या सर्वोत्कृष्ट गोल रक्षणामुळे संत मीरा शाळेचा विजय साकार झाला.
मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात बालिका आदर्श शाळेने जीजी चिटणीस शाळेचा 4 -0असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने गोमटेश शाळेचा 2-1 असा पराभव केला तर अंतिम लढतील संत मीरा शाळेने बालिका आदर्श शाळेचा 2-1 असा पराभव केला संत मीरा शाळेची कर्णधार समीक्षा बुद्रुकच्या दोन गोलामुळे विजय साकार झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक आनंद चव्हाण, आनंद माळवी, प्रसाद नाकाडी, तर बक्षीस समारंभाला टिळकवाडी शाळेचे टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, सचिव एच बी पाटील, शहापूर शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष बापूसाहेब देसाई, स्पर्धा सचिव पी एस कुरबेट ,जयसिंग धनाजी, चंद्रकांत पाटील, उमेश मजुकर, देवेंद्र कुडची, उमेश बेळगुदंकर, बी जी सोलोमन, मयुरी पिंगट, यश पाटील, शिवकुमार सुतार, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले ,वरील संघ तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.