*_शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व मुलांना दप्तरांचे वाटप_*
येथील मराठी शाळा क्रमांक 5 येथे मंगळवार (ता.1) रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर जन्मदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दीपक किल्लेकर होते. यावेळी विजयनगर येथील बेळगावकर हार्डवेअर चे मालक श्री बेळगांवकर यांच्याकडून इयत्ता पहिलीच्या सर्व विदयार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले.
तसेच सरकार मार्फत आलेले गणवेश सर्व मुलांना वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मुचंडीकर सर यांनी लोकमान्य टिळकांच्या हृद आठवणी सांगितल्या. तसेच श्री बेळगावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. रवी नाईक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणी आणि त्यांची साहित्य संपदे विषयी माहिती दिली. श्री दीपक किल्लेकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांच्या आठवणी सांगितल्या. आणि शाळेचे माजी विद्यार्थी बेळगावकर यांनी आपल्या शाळेच्या नवीन विद्यार्थ्यांना दप्तर देऊन शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली म्हणून त्यांचे कौतुक केले.
आजच्या कार्यक्रमास श्री रवी नाईक तसेच पालक वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय होती. प्रास्ताविक पी. ए. माळी यांनी केले. सूत्रसंचालन एच. व्ही. नाथबुवा तर आभार हरिजन सर यांनी मानले.