प्रा. भावना जाधव (बिळगोजी) यांना पीएचडी पदवी प्रदान
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या( व्हीटीयू) आज मंगळवारी पार पडलेल्या दिमाखदार पदवीदान सोहळ्यात हलगा येथील प्रा. भावना जाधव (बिळगोजी) यांना कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते पीएचडी पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
हलगा येथील प्रा. भावना जाधव (बिळगोजी) यांनी विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापिठामध्ये प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना पीएचडी ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली आहे. वेलरेबिलिटी ऑफ स्टील स्ट्रक्चर टू फायर या विषयावर प्रा. भावना जाधव (बिळगोजी) यांनी प्रबंध सादर केला आहे. प्रा. भावना यांना आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेंगलोर येथील डॉ. रवींद्र आर. यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. भावना जाधव (बिळगोजी) या बेंगलोर येथील रेवा युनिव्हर्सिटी ऑफ इंजीनियरिंग येथे सिव्हिल विभाग प्रमुख (एचओडी) म्हणून कार्यरत आहेत. हलगा येथील अभियंता मधुकेश भुजंग बिळगोजी यांच्या पत्नी असलेल्या प्रा. भावना या ॲड. भुजंग बिळगोजी व हलगा कृषी पत्तीन सोसायटीच्या माजी अध्यक्षा जयश्री बिळगोजी यांच्या स्नुशा असून सीमा काशिनाथ जाधव यांच्या कन्या आहेत. उपरोक्त यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.