शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने केलेले कार्य जीवनाला सार्थक बनवते-प्राचार्य जी.वाय.बेन्नाळकर
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यांचा निवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. आज ते महाविद्यालयातून आपल्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत झाले.हा कार्यक्रम प्रा. आर.एम.तेली यांचे अध्यक्षेखाली पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.वृषाली कदम यांच्या ईशस्तवनाने झाली. तद्नंतर स्टॉफ सेक्रेटरी डॉ. डी. एम. मुल्ला यांनी प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यांचा परिचय देऊन उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर आणि त्यांच्या पत्नी यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर म्हणाले की, शिक्षकांनी प्रामाणिक कष्ट आणि समर्पित शैक्षणिक भावनेतून विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य केल्याने विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य उज्वल बनते आणि त्यांचे उज्वल भविष्यच शिक्षकाचे जीवन संतुष्ट बनवते.
अध्यक्ष स्थानावर बोलताना प्रा. आर.एम. तेली म्हणाले की प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर हे हाडाचे शिक्षक होते. नियमित वर्ग आणि आपली अभ्यासूवृती मुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये आपली विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणुन ख्याती प्राप्त केली होती. एक सफल प्राध्यापक म्हणून आपले अस्तित्व महाविद्यालयामध्ये स्थापित करण्याचे कार्य प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यांनी केले.
या समारंभामध्ये डॉ.एच. जे. मोळेराखी, प्रा.अर्चना भोसले, डॉ. आरती जाधव, प्रा. भाग्यश्री चौगुले, प्रा.जगदीश येळ्ळुर, सुषमा देशपांडे, भारता चौगुले आदीने प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी डाँ.गिरजाशंकर माने यांनी सर्वांची आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल एस. सी. कामुले यांनी केले.या कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.