बेळगांव:अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून देखील भाजप नगरसेवकांनी स्थानिक समस्येकडे दुर्लक्ष केले असल्याने आज स्थानिकांनी थेट आमदार असिफ राजु सेट यांना आपल्या समस्या सांगितल्या. त्यावेळी आमदारांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या.
शाहूनगर विठ्ठलाई गल्ली येथे गटारीतुन सांडपाणी जाण्याकरिता वाट उपलब्ध नसल्याने नागरिकांना दुर्गंधीच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. तसेच सर्व सांडपाणी एकाच ठिकाणी साचून राहिले असल्याने येथील नागरिकांच्या विहिरी आणि बोरवेल खराब होत आहेत. तसेच घरांमध्ये सुद्धा पाणी शिरत आहे.
यावेळी स्थानिक नागरिकांनी येथील नगरसेवकांना याबाबत अनेक वेळा तक्रार देखील केली होती .मात्र यावेळी नगरसेवकांनी स्थानिक नागरिकांच्या समस्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. त्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आमदारांसमोर केला.
त्यामुळे आमदारांनी थेट आज घटनास्थळी भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि लवकरात लवकर या समस्या मार्गे लावू असे आश्वासन दिले.तसेच अधिकाऱ्यांना या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना राबवून नागरिकांची समस्या सोडविण्याची सूचना दिली.