मोबाईल चार्जिंग करण्यासाठी गेला आणि जागीच मृत्यू झाला
निपाणी येथील एका 27 वर्षीय युवक मोबाईल चार्जिंग करण्यासाठी गेला होता यावेळी त्याला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्या असल्याची घटना उघडकीस आली आहे.
शिवदास संकपाळ वय 27 राहणार श्रीपेवाडी निपाणी असे या युवकाचे नाव असून तो घरी मोबाईल चार्जिंगला लावायला गेला असता यावेळी विजेचा जोरदार धक्का त्याला लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
या संदर्भात त्याच्या वडिलांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून कलम 174 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.