कर्नाटक भीमसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. निवेदनात त्यांनी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी निदर्शने करून निवेदनाद्वारे दिली
यावेळी सदर निवेदन बेळगाव जिल्हाध्यक्ष प्रवीण मादार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि देशातील महिलांनी युवतींवर वाढते अत्याचारासह त्यांच्या होणाऱ्या हत्येच्या निषेधार्थ तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना कडक शासन करावे अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
मणिपूर येथे दोन महिन्यांपूर्वी एका महिलेचे रस्त्यावर दिवस धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले याच्या निषेधार्थ आज कर्नाटक भीम सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीकेली.
तसेच यावेळी कर्नाटक भीम सेना यांचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय के आर राजू नायक यल्लाप्पा अकमडी निखिल कोलकर नहीम मुजावर यांच्यासह भीमसेनेचे सदस्य उपस्थित होते.
देशामध्ये महिला युवतींवर वाढत्या अत्याचारासह त्यांच्या होणारा हत्याच्या निषेधार्थ कर्नाटक भीमसेनी तर्फे आज निदर्शने करण्यात आली