‘अजमेर कांड’ हा चित्रपट प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर प्रदर्शित करू ! – सचिन कदम, दिग्दर्शक
चिश्तीचे वंशज आणि युथ काँग्रेसचे फारूक, नफिस आणि अन्वर चिश्ती यांनी अजमेर बलात्कार कांड घडवून आणले. याविषयी ‘अजमेर कांड’ हा चित्रपट आम्ही सप्टेंबर 2023 मध्ये प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करत आहोत. सेन्सार बोर्ड या चित्रपटाच्या पोस्टर, बॅनर आणि संवाद यांवर आक्षेप घेत आहे. माझ्या चित्रपटातील कलाकार आणि मला धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत. सत्य घटना सांगायला विरोध का केला जात आहे ? यामध्ये सेक्युलर हिंदूच आम्हाला विरोध करत आहेत. ‘अजमेर बलात्कार कांडा’विषयी चित्रपट आम्हाला प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर आम्ही तो प्रदर्शित करू, असा इशारा ‘अजमेर कांड’ या चित्रपटाचे लेखक आणि निर्देशक श्री. सचिन कदम यांनी दिला आहे. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘अजमेर बलात्कार कांड : मुसलमान लांगूलचालनाचा परिणाम ?’ या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होते. नुकताच देशभरात ‘अजमेर 92’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता ‘अजमेर कांड’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
या वेळी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणि मित्तल म्हणाल्या की, ‘अजमेर बलात्कार कांड’ प्रकरणात किती हिंदू युवतींवर सामूहिक बलात्कार झाले, याची 100, 200 किंवा 250 विशिष्ट संख्या सांगणेही कठीण आहे. अत्याचार झाल्यावर या अल्पवयीन मुलींची छायाचित्रे काढून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्यात आले. यानंतर अनेक मुलींनी आत्महत्या केल्या. बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात पोलिसांची भूमिका ही सकारात्मक असते; मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही नकारात्मक राहिलेली आहे. ‘काश्मीर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता ‘अजमेर 92’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या वेळी अजमेर बलात्कार कांड मोठ्या स्वरूपात झाले; मात्र आजही अनेक ठिकाणी छोट्या स्वरूपात हे होत आहे. आज हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता जागृत झाले पाहिजे आणि आपल्या मुला-मुलींमध्ये जनजागृती केली पाहिजे.
या वेळी राजस्थान येथील ‘सद्गुरु’ वृत्तपत्र आणि वेब पोर्टलचे संपादक श्री. विजय सिंह म्हणाले की, अजमेर बलात्कार कांडमध्ये 200 हून अधिक हिंदू युवतींवर अत्याचार झाल्यावरही अनेक आरोपींना निर्दाेष सोडण्यात आले. याविषयी अंतिम काय घडले, हे त्या वेळी कळले नाही आणि आजही जनतेला नीट कळलेले नाही. त्या वेळी मर्यादित असलेल्या वर्तमानपत्रांनी याविषयीच्या बातम्या छापल्या, म्हणून हा विषय उजेडात तरी आला. ‘अजमेर 92’ हा चित्रपट आल्यावर हिंदू मुलींवर कसे अत्याचार झाले, हे येणार्या पिढीला सुद्धा कळेल. आज अजमेर दर्ग्याशी जोडलेल्यांना पवित्र मानले जात आहे, त्यांनीच ही ‘अजमेर बलात्कार कांड’ची पापे केली आहेत. अजमेर दर्ग्यात आज अनेक हिंदू श्रद्धेने जात आहेत. आता हिंदूंनीच ठरवायचे आहे कि काय करायचे ?