कितवाड धबधब्याला सुद्धा 3 ऑगस्टपर्यंत प्रवेश बंदी
सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ठिकठिकाणी पर्यटनास बंदी केली आहे.येथील चंदगड तालुक्यात मधील असणाऱ्या कितवाड धबधब्याला सुद्धा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून येथील पर्यटनास प्रवेश बंदी केली आहे.
येथील दोन धरणांसह तेथे असलेल्या धबधब्याला जाण्याकरिता पर्यटक नेहमी पावसाळ्यामध्ये गर्दी करत असतात मात्र सध्या सर्व धरणे ओवर फ्लो होऊन वाहू लागले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कितवाड धबधब्याला जाण्याकरिता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ही प्रवेश बंदी 3 ऑगस्टपर्यंत राहणार आहे.