दूधसागर धबधब्याकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये त्याबद्दल रेल्वे पोलिसांकडून घोषणा
दूधसागर धबधब्याकडे जाण्यास रेल्वे पोलीस आणि वन खात्याने बंदी घातली असून त्या बद्दल रेल्वेमध्ये पोलिसांच्याकडून घोषणा केली जात आहे.
दूधसागर धबधबा येथे अतिउत्साही पर्यटकांना मागच्या वर्षी प्राण गमवावे लागले होते.रेल्वे मार्गाच्या बाजूने धबधबा पाहण्यासाठी चालत जावे लागते.दूधसागर धबधब्याकडे रेल्वेची वेग कमी होतो त्यावेळी काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालून खाली उतरतात.
यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना दूधसागर धबधब्याकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.रेल्वे पोलीस रेल्वेमध्ये ध्वनिक्षेपकावरून दूधसागर स्टेशनवर कोणीही उतरू नये असे आवाहन करत आहेत.कोणी प्रवासी तेथे उतरल्यास रेल्वेच्या कलम१४७ नुसार कारवाई करण्यात येईल असे रेल्वे पोलीस सांगत आहेत.