बळ्ळारी नाल्या शेजारील हजारो एकर जमीन पाण्याखाली.
बळ्ळारी नाल्याचे सर्व पाणी नाल्याच्या शेजारी असलेल्या शेत शिवारात शिरले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नाल्याचे पाणी शेती शिवारात शिरले असल्याने शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले आहे.हजारो एकर जमीन नाल्याच्या पाण्यामुळे खराब झाली असून तोंडाला आलेले भात पीक सुद्धा कुजून जाण्याची शक्यता आहे.
https://fb.watch/lXt5Jb2MuT/?mibextid=Nif5oz
बळ्ळारी नाल्याच्या आजूबाजूच्या परिसर हा पाण्याने बुडून गेला असल्याने या भागातील शेतकरी हाताश झाला आहे. तसेच आता पोटाला खायचे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभावला असल्याने आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या भागातील शेतकऱ्यांचे दुखणे हे कायम असल्याचे शेतकरी राजू मर्वे यांनी सांगितले.असून जर बळ्ळारी नाल्याची खोदाई करून या नाल्यातून पाणी व्यवस्थित पाणी जाण्याकरिता वाट मोकळी करून दिल्यास शेती शिवारात पाणी शिरणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.