*राष्ट्राचे भविष्य शिक्षणावर आधारित; राष्ट्र निर्मितीसाठी मोठे योगदान : ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र पोवार*
*बी.के.कॉलेज , राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव, माजी विद्यार्थी संघटना आणि हिंदी प्राध्यापक संघतर्फे “”एकदिवसीय हिंदी पाठ्यक्रम NEP एन. ई.पी. 2023 “” कार्यशाळेचे आयोजन -अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन*
बेळगांव तारीख , 22 जुलै 2023 : कोणत्याही राष्ट्राचे भविष्य हे शिक्षण धोरणावर अवलंबून असते. NEP चे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली प्रदान करणे आहे. या धोरणात शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण आणि विकास आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात आला आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया शिक्षणातून उभी राहत असते. राष्ट्रासाठीचे शिक्षण धोरण हे राष्ट्राच्या भविष्यासाठी विकासाचा एक मार्ग असतो. त्यामुळे शिक्षण धोरण आखताना ते भविष्यवेधी असायला हवे. शिक्षण धोरण म्हणजे त्या देशाची भविष्याची विकासाची दिशा असते. भारत सरकारने 21व्या शतकातील पहिले शिक्षण धोरण जाहीर केले. 1984च्या धोरणानंतर 34 वर्षांने नवीन शैक्षणिक धोरण आले आहे आणि सध्या या धोरणावर मोठी चर्चा सुरू आहे. शिक्षण हे जीवन परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे,
यावर शिक्कामोर्तब झाल्याने समाजमनही शिक्षणासंदर्भाने अधिक जागृत होत असल्याचे अधोरेखित होते. केंद्राने धोरण तयार केल्यानंतर ते स्वीकारण्याची प्रक्रिया अनेक राज्यांनी केली आहे. काही राज्यांनी त्याला विरोध केला आहे. महाराष्ट्राने अंमलबजावणीसाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सरकारने तशी घोषणा केली आहे. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. धोरणाचे यशापयश हे धोरणाची अपेक्षित भूमिका लक्षात घेऊन कार्यरत मनुष्यबळाच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते. त्यामुळे एकदम बदल घडवायचा असेल, तर सक्षम व परिवर्तनवादी मनुष्यबळ कोठून आणणार? म्हणूनच या धोरणात मोठ्या प्रमाणावर बदल सूचवले आहे. काही संस्थांची नव्याने उभारणी केली जाणार आहे. धोरणाप्रमाणे पावले टाकायची म्हटली, तर मोठा निधी लागणार आहे, त्यासाठीचा निधी उपलब्धता महत्त्वाची गोष्ट असणार आहे. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020’ हे ज्येष्ठ वैज्ञानिक डी. के. कस्तुरीनंदन यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले. धोरणात सर्वांना समान शिक्षण, समानता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच स्तंभाचा विचार केला आहे. शिक्षण धोरणात अत्यंत व्यापक दृष्टिकोन राखण्यात आला. आपली संस्कृती आणि उद्याचे भविष्य यांचा संगम घालण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण आनंददायी करण्याबरोबर ते जीवनाभिमुख आणि अधिक रोजगाराभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे. धोरण सशक्त आणि समर्थ शिक्षण व्यवस्था उभी करणारे आहे. शाश्वत विकासाचे ध्येय ते दर्शित करते. त्यामुळेच धोरणाच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागून आहे. धोरणानुसार देशात ‘मनुष्यबळ’ खात्याचे नाव बदलून ‘शिक्षण मंत्रालय’ सुरू करण्यात आले आहे. धोरणात केवळ संस्था उभारणीवर नाही, तर गुणवत्तेच्या दृष्टीनेदेखील कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.त्यामुळेच यशाची अपेक्षा उंचावल्या आहेत. धोरणाची अंमलबजावणी प्रभावी झाली, तर परिवर्तन निश्चित होईल, अन्यथा ‘आणखी एक धोरण’ अशीच स्थिती निर्माण होईल. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते बेळगाव येथील नामांकित राणी पार्वती देवी महाविद्यालय हिंदी विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत संपादक प्रा डॉ राजेंद्र पोवार यांनी केले.
भाऊराव काकतकर महाविद्यालय (बी.के.कॉलेज) , राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव, माजी विद्यार्थी संघटना आणि हिंदी प्राध्यापक संघतर्फे “”एकदिवसीय हिंदी पाठ्यक्रम NEP एन. ई.पी. 2023 “” कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडले यावेळी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील होते.
प्रमुख वक्ते म्हणून बेळगाव येथील नामांकित राणी पार्वती देवी महाविद्यालय हिंदी विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत संपादक प्रा डॉ राजेंद्र पोवार आणि प्रमूख वक्त्या म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या बीओएस अध्यक्षा प्रा. डॉ . मनिषा नेसरकर उपस्थित होत्या यांनी वेगवेगळ्या विषयांच्या वरती अतिशय प्रभावी शब्दात शिक्षण धोरणाबद्दल उत्तम माहिती सांगून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रिहान मुल्ला यांच्या स्वागत आणि ईशस्तवनाने करण्यात आली. स्वागत आणि प्रास्ताविक प्रा निता पाटील यांनी केले. परिचय प्रा सुनिल ताटे यांनी करुन दिला. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ एस एन पाटील यांनी केले.
सुत्रसंचलन आणि आभार प्रा. अमित चिंगळी यांनी मानले. यावेळी प्रा. बी. आय. वसुलकर, प्रा अनिता पाटील, प्रा. डी. टी. पाटील, प्रा. एम व्हीं. शिंदे, प्रा. निलेश शिंदे, प्रा. शुभम चव्हाण, प्रा. योगेश मुतगेकर, प्रा. सूरज पाटील, प्रा. नारायण तोराळकर तसेच व्यवस्थापक कमीटीचे पदाधिकारी सदस्य प्राध्यापक विद्यार्थी पालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.