सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश केले संपादन
इंडिया तायक्वांदो , कर्नाटक ओलंपिक असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर यांच्यामार्फत 40 वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा दिनांक 13 जुलै ते 16 जुलै या रोजी कोरमंगल इंडॉर स्टेडियम बेंगलोर येथे आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धा क्योरगी व पुमसे. विभागात खुल्या स्पर्धा व सब जुनिअर कॅडेट ज्युनियर व सीनियर विभागात यशस्वी पार पडल्या.या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा निपाणी येथून सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
खुल्या स्पर्धेमध्ये 12 वर्षे आतील विभागात अवनी कुलकर्णी सुवर्ण पदक, आरोशी बोधले सुवर्ण पदक, रुहि बोधले कास्य पदक, पुष्पा पाटील रौप्य पदक, अवनी व्हधडी कास्य पदक, लावण्या सावंत कास्य पदक., तर मुलांच्या विभागात.
समर्थ निर्मले 1 सुवर्ण पदक 1 कास्यपदक, श्लोक मलाबादे एक रौप्य पदक व एक कास्यपदक, अथर्व शेळके रौप्य पदक, सारंग अक्की रौप्य पदक, पटकावले तर सीनियर विभागात प्रथमेश भोसले, देवराज मल्हाडे, ओमकार अलकनुरे, आदित्य सोलापूर यांनी अंतिम फेरीपर्यंत लढत दिली यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक बबन निर्मले यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर सर्व पालकांचे प्रोत्साहन मिळाले यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.