तब्बल चार लाख रुपये किमतीचा बनावट दारूचा साठा जप्त
सदाशिवनगर येथील वीरूपाशी रेसिडेन्शियल या अपार्टमेंट मध्ये पोलिसांनी धाड टाकून तब्बल चार लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर बनावट दारू साठा जप्त केला आहे.
खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हे धाड टाकल्या असून यामध्ये त्यांनी दारू साठ्यासह अन्य साहित्य जप्त केले आहेत तसेच दोघाजणांना अटक सुद्धा केली आहे. दोघेजण पळून घेण्यात यशस्वी झाले आहेत.
सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली असून पोलिसांनी हसन साहेब बेपारी वय 22 राहणार उज्वल नगर बेळगाव आणि राजेश केशव नायक वय 41 राहणार विजयनगर हिंडलगा या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या 4 लाख रुपयांच्या मुद्देमालामध्ये 100 पायपर्स, ब्लेंडर्स प्राईड, व्हॅट – 69, ब्लॅक अँड व्हाईट, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅजिक मोमेंट्स, स्मिर्नोफ, मॅकडोवेल्स, बकार्डी ओल्ड माँक, रियल -7, इम्पिरियल ब्लू, डीएसपी ब्लॅक, ब्लॅक डॉग, टीचर्स कंपनी या ब्रँडच्या व्हिस्की, रम, होडका या बनावट दारूंच्या 750 एमएलच्या 439 बाटल्या. ओरिजनल चॉईस दारूच्या 375 एमएलच्या 20 बाटल्या, ओल्ड टावरीन दारूचे 180 एमएलचे दोन टेट्रा पॅक, दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी इंडिका कार 21,500 रुपये किमतीचे चार मोबाईल फोन आणि रोख 17,500 रुपयांचा समावेश आहे.
सदर आरोपी दारूच्या काम बाटल्या गोळा करत होते त्यानंतर गोवा आणि कर्नाटक राज्यात तयार होणाऱ्या अत्यंत कमी किमतीच्या दारूवर रासायन प्रक्रिया करून बनावट उंचीची दारू तयार करत होते ही दारू ते विविध उंची ब्रँडचे लेबल लावून पॅक करून विकत होते.
लोकांची होणारी फसवणूक लक्षात घेऊन पोलिसांनी धाड टाकत हा उपलब्ध असलेला मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून त्याबाबत अधिक तपास करत आहेत.