मोहरमच्या पार्श्वभूमीवर शांतता सभेचे आयोजन
मुस्लिम बांधवांच्या नवीन वर्षाची सुरुवात ही इस्लामिक कॅलेंडर प्रमाणे होती. म्हणजेच मोहरम महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते त्यामुळे यंदा 29 जुलै रोजी होणाऱ्या मोहरम ताज्याची सुरुवात 19 जुलैपासून होणार आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगावातील मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची खडेबाजार पोलीस स्थानकात बैठक बोलविण्यात आली होती.
यावेळी या बैठकीत मोहरम उत्सवाची तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच मोहरम शांततेत पार पडण्याची सूचना पोलीस प्रशासनाने मुस्लिम बांधवांना केली याप्रसंगी मोहरमच्या पार्श्वभूमीवर पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये मोहम्मद साबिर शेख, मुजावर,राहुल जाधव समीउल्ला पठाण भाऊ किल्लेकर माजी महापौर मालोजी अष्टेकर पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर पीएसआय सौदागर राहुल जाधव हाजी अली नुरानी यांच्यासह आणि उपस्थित होते.